बातम्या
सकाळचा चहा करतो ताण-तणावापासून सुटका, आहेत विविध फायदे
By nisha patil - 8/15/2024 7:34:32 AM
Share This News:
चहातील एल थिआनिन या तत्त्वामुळे चहा पिल्यावर मानसिक शांती लाभते. गेल्या काही वर्षांत वैज्ञानिक केलेल्या शोध आणि संशोधनांतून असे आढळून आले आहे. म्हणून इतर पेयांपेक्षा चहा हा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. मात्र, चहाचा अतिरेक शरीरासाठी वाईट ठरू शकतो. म्हणूनच योग्य प्रमाणात चहा घेतल्यास शरीराचे नुकसान न होतो, फायदाच होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम अनेकांना चहा हवा असतो. देशातील ८३ टक्के कुटुंबांना सकाळी उठल्या उठल्या चहाची गरज भासते अशी आकडेवारी सांगते.
हर्बल टी वजन घटवण्यासाठी उपयोगी आहे. तर काळ्या चहातही अशीच गुणवैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे यात कॅलरीज नसतात, यामुळे वजनही वाढत नाही. चहातील फ्लेवनाइड्स तत्वामुळे शरीरातील हाडांची मजबूती वाढते. चहामध्ये असलेल्या फ्लोराइड्स तत्त्वामुळे दातांत प्लाक चिटकून बसण्यास प्रतिबंध होतो. अनेक संशोधनांत असे दिसून आले आहे की, १० वर्षांपासून चहा पित असलेल्या लोकांच्या हाडांत इतरांच्या तुलनेत अधिक खनिजे आढळून येतात.
चहाच्या सेवनामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला संक्रमणांपासून लढण्यास मदत मिळते. रोज चहा पिल्याने तुम्ही गंभीर आजारांच्या धोक्यापासून वाचू शकतात. चहातील वृद्धत्व प्रतिरोधक क्षमतेमुळे तारुण्य टिकते. वाढत्या वयामुळे शरीराला होणाऱ्या हानीपासूनही चहा वाचवतो. कॉफीच्या तुलनेत चहात कॅफिनचे प्रमाण कमी असते. यामुळे चहा सेवनामुळे धोका संभवत नाही. चहाचा खास फ्लेवर असून अॅरोमा यामुळेच येतो. पॉलिफेनाल्स या खास अँटी ऑक्सिडंटमुळे चहा आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. चहा शरीराला संक्रमणांपासून दूर ठेवते. ग्रीन टी पिल्यानंतर चयापचय क्रियेचा वेग वाढतो. यामुळे अनेक ७० ते ८० कॅलरी जाळल्या जातात. चहामुळे वजन घटवता येऊ शकते.
सकाळचा चहा करतो ताण-तणावापासून सुटका, आहेत विविध फायदे
|