बातम्या
सौ. ज्योती बुवा तोरसकर यांना शिवाजी विद्यापीठाची Ph.D. प्रदान
By nisha patil - 3/22/2025 8:12:01 PM
Share This News:
सौ. ज्योती बुवा तोरसकर यांना शिवाजी विद्यापीठाची Ph.D. प्रदान
मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या, संशोधक आणि शिक्षिका सौ. ज्योती बुवा तोरसकर यांना शिवाजी विद्यापीठाची इतिहास विषयातील डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्ग: इतिहास आणि पर्यटन" या विषयावर त्यांनी संशोधन करून प्रबंध सादर केला होता.
या संशोधनासाठी त्यांना न्यू कॉलेजच्या डॉ. कविता गगराणी यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच डॉ. अवनीश पाटील, डॉ. सुमेधा नाईक, श्री. गुरुनाथ राणे आणि श्री. लक्ष्मण वळंजू यांचे सहकार्य मिळाले.
सौ. ज्योती बुवा तोरसकर यांना शिवाजी विद्यापीठाची Ph.D. प्रदान
|