बातम्या

मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार संघर्षशील अभिनेत्रींची सुटका

Mumbai Polices big revelation

By nisha patil - 3/15/2025 4:17:26 PM
Share This News:

मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार संघर्षशील अभिनेत्रींची सुटका

पवई परिसरात सुरू असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, एका दलालाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महिला अभिनेत्री आहेत आणि त्या मनोरंजन क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी संघर्ष करत होत्या.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हॉटेलवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी देहविक्री व्यवसायात गुंतलेल्या दलाल श्याम सुंदर अरोराला अटक केली आहे. यातून सुटका करण्यात आलेल्या चार महिलांपैकी एकीने हिंदी टीव्ही सीरियलमध्ये काम केल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता  आणि अनैतिक वाहतूक  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार संघर्षशील अभिनेत्रींची सुटका
Total Views: 17