विशेष बातम्या
शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीवर महापालिकेचे दुर्लक्ष?
By nisha patil - 3/26/2025 8:57:44 PM
Share This News:
शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीवर महापालिकेचे दुर्लक्ष?
निधी लाटण्याचा डाव?
कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानाची तटबंदी धोकादायक अवस्थेत असूनही महापालिकेने कोणतीही दखल घेतलेली नाही. दीड वर्षांपूर्वी तटबंदी कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता, तरीही आजवर कोणतीही दुरुस्ती झालेली नाही.
दरम्यान, शासनाने मैदान आणि नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे, मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. तटबंदीच्या पायथ्याशी पाणीपुरवठ्याच्या पाईपमधून वाहणारे पाणी तटबंदी कमजोर करत आहे, याकडे वारंवार तक्रारी होऊनही दुर्लक्ष केले जात आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, तटबंदी जाणीवपूर्वक पाडली जातेय, जेणेकरून नव्याने निधी मिळवून टक्केवारी लाटता येईल. नागरी कृती समितीने यावर आवाज उठवला असून तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदीवर महापालिकेचे दुर्लक्ष?
|