बातम्या

माझे पोट रोज साफ होत नाही परंतु पोटात कधीच दुखत वगैरे नाही. रोज पोट साफ होणे गरजेचे असते का?

My stomach doesnt clear every day but never stomach ache etc


By nisha patil - 5/6/2024 6:02:46 AM
Share This News:



रोज पोट साफ होणे गरजेचे असते, नाहीतर भविष्यात अनेक आजारांना निमंत्रण देण्या सारखे…..पित्ताचे आजार, मूळव्याध, मणक्याचे आजार, पोटाचे विकार, थॉयराइड, मधूमेह….

पोट साफ नसल्यामुळे…. घाण साचून शरीरात विषारी पणा वाढतो…. रक्त अशुद्ध होऊन माणूस अनेक आजारांना बळी पडतो.

पोट साफ होत नसल्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही…सतत अपचन होते…पित्ताचा त्रास सुरू होतो.

जागरण टाळा, रोजच्या जेवनात पालेभाज्या खा, तेलकट तिखट खाऊ नका…रात्रीचे जेवन लवकर करा….रात्रीचे जेवन साडेसात वाजता करा.. रात्री जेवल्यानतंर शतपावली करा…रात्रीच्या जेवनानंतर दोन तासांनी झोपा, भरपूर पाणी प्या….योगासने करा.प्राणायाम, कपालभाती करा.

बध्दकोष्टता जास्त असेल तर रोज सकाळी दोन किंवा तीन ग्लास कोमट पाणी प्या आणि दोन कि.मी.फिरायला जा…

बध्दकोष्टता वाढत असेल तर…. महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा एरंडेल तेल कोमट पाण्यातून घ्यायला हरकत नाही….

रात्री लवकर झोपा साडे नऊ किंवा दहा वाजता…

सकाळी सव्वा सहा किंवा साडे सहा वाजता उठा.

जीवन शैलीत सुधारणा केल्यास निरामय जीवन जगता येईल.
 


माझे पोट रोज साफ होत नाही परंतु पोटात कधीच दुखत वगैरे नाही. रोज पोट साफ होणे गरजेचे असते का?