बातम्या
योग निसर्गोपचार कौशल्य व उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
By nisha patil - 3/22/2025 8:15:17 PM
Share This News:
योग निसर्गोपचार कौशल्य व उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर, दि. २१ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने योग निसर्गोपचार क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे नीलांबरी सभागृहात आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते. मार्गदर्शन करताना त्यांनी, योग निसर्गोपचार ही काळाची गरज असून, याच्या माध्यमातून आरोग्य व सकारात्मक जीवनशैली साधता येते, असे सांगितले.
कार्यशाळेचे आयोजक तथा आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा सल्ला दिला. कार्यशाळेचे समन्वयक अरविंद पालके यांनी योग निसर्गोपचार क्षेत्राची व्याप्ती स्पष्ट केली.
यावेळी डॉ. प्रकाश राऊत यांनी स्टार्टअप व उद्योजकता संधी, श्री. गणेश गोडसे यांनी योग निसर्गोपचार उद्योजकांसाठी बँकिंग प्रणाली, विक्रम रेपे यांनी व्यावसायिक वाढीसाठी प्रभावी रणनीती, संजय शिंदे यांनी यशस्वी निसर्गोपचार व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव या विषयांवर मार्गदर्शन केले.
रोहन कांबळे (कौशल्य विकास अधिकारी), कानिफनाथ पंढरे, रविंद्र खैरे, वसंत सिंघण, उदय घाटे, वीणा माल्डीकर, डॉ. नीलम मोरे, प्रीती चव्हाण, आसावरी कागवाडे, क्षितिजा पाटील व सुधाकर भोसले यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
योग निसर्गोपचार कौशल्य व उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
|