बातम्या
पाककलेतून उत्कृष्टतेचा प्रवास - नीलम बनछोडे
By nisha patil - 12/3/2025 6:28:58 PM
Share This News:
पाककलेतून उत्कृष्टतेचा प्रवास - नीलम बनछोडे
नीलम बनछोडे या एक प्रेरणादायी गृहिणी असून, आपल्या अंगभूत कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पाककलेची विशेष आवड आणि नव-नवीन पदार्थ तयार करण्याची उत्सुकता यामुळे त्यांनी आपल्या आवडीला एक वेगळी ओळख दिली आहे.
घरगुती पदार्थ तयार करण्यापासून ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय आहे. आजपर्यंत त्यांनी 500 हून अधिक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून, विशेष म्हणजे ज्या स्पर्धांमध्ये त्या सहभागी होतात, त्यामध्ये त्या नेहमीच विजेतेपद मिळवतात. त्यांच्या मेहनतीचा आणि कलेचा हा विजय आहे.
नीलम बनछोडे यांची पाककला केवळ स्पर्धांपुरती मर्यादित न ठेवता, त्यांनी आपल्या कलेला व्यवसायात रूपांतरित केले आहे. घरगुती पदार्थ तयार करून त्या घरपोच सेवा (Home Delivery) देतात. यामध्ये मसालेदार पदार्थ, गोडधोड, फराळाचे पदार्थ, तसेच सणासुदीच्या विशेष खाद्यपदार्थांची ऑर्डर त्या स्वीकारतात. त्यांच्या हातच्या चवीला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो.
पाककलेतून उत्कृष्टतेचा प्रवास - नीलम बनछोडे
|