बातम्या

पश्चिम घाटातील जैवविविधतेत नवा शोध – "थीओबाल्डीस कोकणेसिस" गोगलगाय आढळली

New discovery in biodiversity of Western Ghats


By nisha patil - 3/25/2025 7:50:58 PM
Share This News:



पश्चिम घाटातील जैवविविधतेत नवा शोध – "थीओबाल्डीस कोकणेसिस" गोगलगाय आढळली

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली नवीन गोगलगाय

कोकण किनारपट्टीजवळील पश्चिम घाटातील अरण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी गोगलगायच्या नवीन प्रजातीचा शोध लावला. प्राध्यापक डॉ. अमृत भोसले आणि त्यांच्या संशोधन संघाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनसुरे गावाजवळ, देवगिरेश्वर मंदिर परिसरात ही नवीन गोगलगाय आढळून आणली.
 

कोकणात आढळल्यामुळे या नवीन प्रजातीला "थीओबाल्डीस कोकणेसिस" असे नाव देण्यात आले आहे. गोगलगाय आणि शिंपले या विषयावर पीएचडी पूर्ण केलेले डॉ. भोसले सध्या पश्चिम घाटातील गोगलगायांच्या विविध प्रजातींवर संशोधन करत आहेत.
 

न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय नियतकालिक मोनुस्कन रिसर्च मध्ये त्यांच्या संशोधनाला प्रसिद्धी मिळाली आहे. या शोधामुळे जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळणार असून, कोकणातील वन्यजीव संशोधनासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


पश्चिम घाटातील जैवविविधतेत नवा शोध – "थीओबाल्डीस कोकणेसिस" गोगलगाय आढळली
Total Views: 19