बातम्या
टाऊन हॉलमध्ये झाडांसाठी नावफलक आणि QR कोडचा नव उपक्रम
By nisha patil - 3/31/2025 3:01:46 PM
Share This News:
टाऊन हॉलमध्ये झाडांसाठी नावफलक आणि QR कोडचा नव उपक्रम
८० झाडांना शास्त्रीय नावासह माहितीफलक; पर्यटकांना होणार लाभ
QR कोड स्कॅन करून मिळणार झाडांची संपूर्ण माहिती
टाऊन हॉल परिसरातील ८० झाडांना त्यांच्या शास्त्रीय आणि प्रचलित नावाच्या पाट्या लावण्याची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच त्या झाडांवर लावल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, या पाट्यांसोबत झाडांची सविस्तर माहिती देणारा QR कोडही असणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उद्यान विभागात हा पहिलाच उपक्रम राबवला जात असून, भविष्यात इतर उद्यानांमध्येही अशा माहितीफलक लावण्याचा विचार आहे. अनेकांना झाडांची नावे आणि त्यांची माहिती माहिती नसते, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. QR कोड स्कॅन केल्यास झाडाची संपूर्ण माहिती विकिपीडियाच्या लिंकद्वारे मिळणार आहे.या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना जैवविविधतेची माहिती सहज मिळेल, तसेच पर्यावरण जागृतीलाही चालना मिळणार आहे.
टाऊन हॉलमध्ये झाडांसाठी नावफलक आणि QR कोडचा नव उपक्रम
|