बातम्या
"मल्हार सर्टिफिकेशनशिवाय मटण विक्री नाही" – नितेश राणे यांचा निर्धार
By nisha patil - 11/3/2025 3:22:49 PM
Share This News:
"मल्हार सर्टिफिकेशनशिवाय मटण विक्री नाही" – नितेश राणे यांचा निर्धार
मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी 'मल्हार सर्टिफिकेशन' अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू समाजातील खाटीकांना हे प्रमाणपत्र मिळणार असून, मल्हार सर्टिफिकेशन नसलेल्या दुकानांमधून मटण किंवा मांस खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राणे यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमामुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि ग्राहकांना भेसळमुक्त मांस उपलब्ध होईल. 'मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम' या वेबसाइटद्वारे प्रमाणपत्रांचे वाटप होणार असून, या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
"मल्हार सर्टिफिकेशनशिवाय मटण विक्री नाही" – नितेश राणे यांचा निर्धार
|