बातम्या
आजकाल बहुतेक लोक उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत.
By nisha patil - 6/13/2024 5:43:56 AM
Share This News:
कोलेस्ट्रॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आजची जीवनशैली आणि चुकीचा आहार. टोमॅटोचा रस हृदयासाठी खूप फायदेशीर मानला जातो. म्हणून, जर एखाद्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर त्याने दररोज नियमितपणे टोमॅटोचा रस प्यावा. कारण टोमॅटोचा रस सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते.कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे पेय घ्या
डाळिंबाचा रस सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त ठरते. डाळिंबाचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असतो. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे रक्ताभिसरण सुधारण्याचे काम करते. हा रस आरोग्य सुधारण्याचे काम करतो. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे हार्ट अॅटॅकचा धोकाही निर्माण होतो. अधिक तेलयुक्त आहार घेतल्याने तसंच सिगरेट पिणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
कोलेस्ट्रॉल वाढले असेल अथवा कॉलेस्टेरॉल वाढत असेल, पण कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे काय आहेत. आपल्या शरीरातील नर्व्हेस सिस्टिमचे सुरक्षा कवच आणि हार्मोन्स निर्माण करण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका असते. रक्तामध्ये चरबी मिक्स होते तेव्हा कोलेस्ट्रॉल तयार होते. आपल्या शरीरामध्ये दोन स्वरूपाचे कोलेस्टेरॉल असते. एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन – चांगले कोलेस्टेरॉल) आणि एक एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, वाईट कोलेस्टेरॉल). शरीरासाठी चांगले कोलेस्टेरॉल फायदेशीर ठरते. हे अत्यंत हलके असते आणि आपल्या रक्तातील साठलेली चरबी वाहून नेण्यास मदत करते. मात्र वाईट कोलेस्टेरॉल हे शरीराला नक्कीच हानिकारक ठरते. यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे एचडीएल 60 मिलीग्रॅमपेक्षा अधिक आणि एलडीएल हे 100 मिलीग्रॅमपेक्षा कमी असायला हवे. ही माहिती चा हेतू आपल्या ज्ञानात भर व्हावी म्हणून देत आहे.
आजकाल बहुतेक लोक उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत.
|