बातम्या
मसाल्याच्या डब्यात जायफळ आवर्जून असूद्यात कारण …
By nisha patil - 8/16/2024 7:23:32 AM
Share This News:
जायफळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. जायफळाच्या सेवनाने अनेक व्याधींपासून सुटका होते. स्वयंपाक घरामध्ये असणारे मसालावर्गीय जायफळ खाण्यात कमी प्रमाणात वापरतात मात्र त्याचे फायदे अनेक आहेत. खालील समस्यांवर जायफळ गुणकारी आहे.
निद्रानाश-
निद्रानाशाची पीडित असणाऱ्या व्यक्तींनी जायफळ दुधात टाकून रात्री प्यावं यामुळे चांगली झोप लागते. जायफळ उगाळून कपाळावर तिचा लेप लावल्यासही झोप लवकर येते. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच तुम्ही शांत व दीर्घकाळ झोपता.
रोगप्रतिकारशक्ती –
जायफळामध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखणारी तत्वे असून यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाणही मुबलक आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
सर्दी-खोकला –
सर्दी-खोकल्यावर उपचार म्हणून एक कप गरम पाण्यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर घालून याचे सेवन केल्यास गुण येतो. तसेच पाव चमचा जायफळ पूड चहामध्ये घालून प्यायल्यासही सर्दी-खोकला कमी होतो.
वेदनाशामक-
जायफळामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच पोटदुखी आणि सूज येणे या दोन्हींमध्ये जायफळाचा वापर केला जातो. आपल्याला सांधेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, गाठी, जखमा आणि इतर सर्व आजारांमध्येही जायफळाचा वापर केला जाऊ शकतो. जायफळाचे तेलही
लहान मुलांना गुणकारी –
लहान मुलांना दूध पचायला जड जाते. अशा वेळी अर्धे दूध व अर्धे पाणी घालून त्यात एक जायफळ टाकून उकळून थोडे थंड करून पाजल्यास मुलांना दूध पचते.
जायफळाचे अतिसेवन करू नये-
जायफळ प्रकृतीने उष्ण असल्याने ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता अधिक असते, त्यांनी जायफळाचे सेवन योग्य प्रमाणातच करावे. जायफळाच्या अतिसेवनाने सुस्ती, क्वचित गुंगीही येते. जायफळाच्या अतिसेवनाने मळमळणे, दम लागणे, अशा समस्या ही उद्धभवू शकतात यासाठी सेवन मर्यादित प्रमाणात केले जाणे आवश्यक आहे.
मसाल्याच्या डब्यात जायफळ आवर्जून असूद्यात कारण …
|