बातम्या

१२ मार्चला चार हजार शेतकरी मंत्रालयावर धडकणार.

On March 12 four thousand farmers will strike at the Ministry


By nisha patil - 1/3/2025 8:48:35 PM
Share This News:



१२ मार्चला चार हजार शेतकरी मंत्रालयावर धडकणार.

शक्तीपीठ महामार्गाविरोधात  आझाद मैदानावर महामोर्चा 

कोल्हापूर जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत आहे. महामार्ग बाधित अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारने महामार्ग बनवण्याचा घाट घातला आहे. यामुळे आता मुंबईतील आझाद मैदानावर  येत्या १२ मार्चला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात बायका-मुलांसह सहभागी होण्याचा निर्धार आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी केला.मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून चार हजार शेतकरी या मोर्चाला जाणार असल्याचे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितल. 

 बैठकीला आमदार सतेज पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, संपत देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


१२ मार्चला चार हजार शेतकरी मंत्रालयावर धडकणार.
Total Views: 23