बातम्या
भीमा कोरेगाव अंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत बैठकीचे आयोजन…
By nisha patil - 2/18/2025 4:23:55 PM
Share This News:
भीमा कोरेगाव अंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत बैठकीचे आयोजन…
मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू : ना. प्रकाश आबिटकर
भीमा कोरेगाव अंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भीमा-कोरेगावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून 3 जानेवारी 2018 ला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर येथे आंबेडकरी संघटनाही त्यात सहभागी झाल्या होत्या. यात सहभागी 1750 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत राज्यस्तरावर मु. देवेंद्र फडणवीसांच्या स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ना. प्रकाश आबिटकरांनी दिले. आपल्याला सर्व लोकांना मदत करायची असून यावर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू. यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करून चांगला तोडगा काढू असे आश्वासनही संघटनेला यावेळी त्यांनी दिले.
भीमा कोरेगाव अंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत बैठकीचे आयोजन…
|