बातम्या
पिलीव आठवणी ९५ वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 4/3/2025 5:11:35 PM
Share This News:
पिलीव आठवणी ९५ वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिलीव (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील एसएससी ९५ माजी विद्यार्थी संघटनेच्या 'आठवणी ९५' उपक्रमांतर्गत भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना निर्भीड आणि प्रभावी वक्ता बनवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धक आणि प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.
स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व वस्तूरूप बक्षिसे देण्यात आली. ग्रामस्थ आणि श्रोत्यांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आठवणी ९५ संघटनेने याआधीही पिण्याच्या पाण्याची सोय, रंगकामासाठी आर्थिक मदत तसेच स्पर्धा परीक्षा आयोजनासारखे उपक्रम राबवले आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आठवणी ९५ संचालक आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.
पिलीव आठवणी ९५ वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
|