बातम्या
अनेक प्रकारचे आजारांवर रामबाण उपाय : एरंडेल तेल !!
By nisha patil - 8/7/2024 11:34:05 AM
Share This News:
रात्रीचं जागरणं, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे अनेकांना पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात.
हे तेल पहाटे घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. या तेलाचा ओशटपणा, ढेकर येणं हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनशापोटी घेतल्यास फायदा होतो. हे तेल इतकं गुणकारी आहे की, ज्यांना वारंवार पोट फुगणे, गच्च झाल्यासारखं वाटतं, पोट साफ होत नाही असे त्रास होतात. या त्रासांमुळे ह्रदयविकार उद्भवण्याचीसुद्धा शक्यता असते, हे त्रास वेळच्या वेळी थांबवायचे असतील, तर आयुर्वेदात एरंडेल तेल पिण्याचा सल्ला दिला जातो. हे तेल शरद आणि वसंत ऋतुत घ्यावे.
वसंत ऋतुत उष्णता वाढलेली असते. यामुळे ऋतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि प्रकृतीत होणारे त्रास टाळण्यासाठी एरंडेल तेल प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात.
पोट साफ होण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या चुर्णांचा वापर करतात. यावर एरंडेल तेल प्यायल्यास फायदेशीर ठरते. कोठा साफ होण्याकरिता वर्षातून दोन वेळा तरी शरद आणि वसंत ऋतुत एरंडेल तेल पिण्याचा सल्ला वैद्य देतात.
कसं घ्याल ?
सकाळी रिकाम्या पोटी एरंडेल तेल प्यायल्यास शरीराला लागू पडतं, असे आयुर्वेदात सांगितले आहे. एरंडेल तेल पिताना पोट थोडं रिकामं ठेवावं. भरपेट खाल्ल्यानंतर एरंडेल तेल घेऊ नये. प्रौढांची मात्रा म्हणजे वय वर्षे 20 ते 80 वर्षांपर्यंत 30मिली. घ्यावे. रात्रीच्या वेळी शक्यतो अत्यंत कमी किंवा हलका आहार घ्यावा. गरम पाणी, गरम चहा किंवा गरम पेजेतून एरंडेल घेऊ शकता किंवा लिंबू पाणी, ताक यातूनही एरंडेल तेल घेतलं तरी चालतं. एरंडेल तेल प्यायल्यानंतर तेलाच्या ओशटपणाचा तोंडाला आलेला त्रास जाण्यासाठी कोकम किंवा आमसूल घ्यायला हरकत नाही.
अनेक प्रकारचे आजारांवर रामबाण उपाय : एरंडेल तेल !!
|