बातम्या
पन्हाळा शिवतीर्थ तलाव विकासासाठी सुधारित आराखड्याचे आदेश
By nisha patil - 4/4/2025 2:49:21 PM
Share This News:
पन्हाळा शिवतीर्थ तलाव विकासासाठी सुधारित आराखड्याचे आदेश
दहा कोटींच्या निधीतून बगीचा, पदपथ आणि अन्य कामे
मे अखेरीस काम सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पन्हाळ्यातील ऐतिहासिक शिवतीर्थ तलाव परिसरातील विकासकामांचा सुधारित आराखडा आठ दिवसांत सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.
विशेष अनुदान योजनेतून पन्हाळा नगरपरिषदेला मंजूर झालेल्या दहा कोटींच्या निधीतून तलाव परिसरातील बगीचा, पदपथ आणि इतर विकासकामे करण्यात येणार आहेत. आमदार नरके यांनी शिवरायांचा पुतळा स्फूर्तीदायक करण्याबरोबरच लेझर शोचा समावेश करण्याच्या सूचनाही दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी कामे जलदगतीने करण्याचे आदेश दिले असून, सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाने स्थळ पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करावे. सुधारित आराखडा तयार करून प्रशासनाकडे सादर केल्यानंतर मे अखेरीस कामे सुरू करण्यात येणार आहेत.
पन्हाळा शिवतीर्थ तलाव विकासासाठी सुधारित आराखड्याचे आदेश
|