बातम्या
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मार्ग मोकळा; शुभांगी ताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
By nisha patil - 5/4/2025 10:24:40 PM
Share This News:
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मार्ग मोकळा; शुभांगी ताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
राज्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा व शालार्थ आयडीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षकेतर पदे व्यापगत करून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून बिनपगारी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला. त्यांच्या प्रयत्नांचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मार्ग मोकळा; शुभांगी ताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
|