बातम्या
कोल्हापुरात ‘आयटी हब’साठी मार्ग मोकळा
By nisha patil - 2/4/2025 3:18:45 PM
Share This News:
कोल्हापुरात ‘आयटी हब’साठी मार्ग मोकळा
मुंबई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार कोल्हापूरच्या शेंडापार्क येथे ‘आयटी हब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरित होणार आहे. त्याबदल्यात विद्यापीठाला कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यात 60 ते 100 हेक्टर शेतीयोग्य जागा देण्यात येणार आहे.
ही पर्यायी जागा निश्चित करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या सहमतीने निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयामुळे कोल्हापुरात ‘आयटी हब’ उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापुरात ‘आयटी हब’साठी मार्ग मोकळा
|