बातम्या

कोल्हापूरच्या वर्षा नगरमध्ये जनतेचा एल्गार!

Peoples Elgar in Kolhapurs Varsha Nagar


By nisha patil - 7/4/2025 4:10:26 PM
Share This News:



कोल्हापूरच्या वर्षा नगरमध्ये जनतेचा एल्गार!
एसटीपी प्रकल्पाविरोधात आवाज बुलंद – सर्वपक्षीय कृती समिती स्थापन

कोल्हापूरच्या वर्षा नगर परिसरातील नागरिकांनी एसटीपी प्रकल्पाविरोधात एकवटत प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे. “आरोग्याशी खेळणारा प्रकल्प नकोच!” असा निर्धार करत वर्षा नगर मित्र मंडळाच्या पुढाकाराने एक जोरदार आंदोलन उभं राहिलं आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नागरिकांनी अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर, कार्यकर्त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेसमोर सुसंगत आणि स्पष्ट भूमिका मांडत, नागरिकांच्या भावना ठामपणे व्यक्त केल्या.

या आंदोलनाला अधिक संघटित आणि परिणामकारक स्वरूप देण्यासाठी ६ एप्रिल रोजी झालेल्या विशेष बैठकीत सर्व पक्षांच्या एकमताने "एसटीपी विरोधी कृती समिती" स्थापन करण्यात आली.

या बैठकीला माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांचे प्रतिनिधी, महिला भगिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकवटलेल्या या जनसमूहाने प्रशासनास ठाम संदेश दिला – "जनतेच्या विरोधाला दुर्लक्ष करता येणार नाही!"

प्रकल्पाच्या निषेधार्थ परिसरात ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड्स लावण्यात आले असून, ‘एसटीपी हटाव’चा आवाज आता घराघरात पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वर्षा नगर मित्र मंडळ  यांचं नेतृत्व या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरत असून, पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


कोल्हापूरच्या वर्षा नगरमध्ये जनतेचा एल्गार!
Total Views: 18