बातम्या
जोतिबाची चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सहकार्य करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 3/25/2025 7:40:57 PM
Share This News:
जोतिबाची चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सहकार्य करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. २५: श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे होणारी चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी भाविक, व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यापारी, प्रशासकीय अधिकारी आणि देवस्थान समितीच्या सदस्यांनी यात्रेत प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत चर्चा केली. भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, तसेच दान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लास्टिक टाळावे, असे आवाहन करण्यात आले.
यात्रेकरू आणि व्यापाऱ्यांसाठी बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने करावे, असेही ठरविण्यात आले. व्यापारी प्रतिनिधींनी प्लास्टिक मुक्त यात्रेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जोतिबाची चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सहकार्य करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|