बातम्या

‘डाळिंबा’ची साल सुद्धा आहे गुणकारी, वाढते गर्भधारणा क्षमता

Pomegranate bark is also beneficial


By nisha patil - 8/15/2024 7:33:00 AM
Share This News:



डाळिंबाचे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे होतात. महिला तसेच पुरूषांनी डाळिंब नियमित खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. हे एक पित्तशामक फळ असून त्यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. डाळिंब हे आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. तसेच डाळिंबाच्या सालीतही भरपूर औषधी गुणधर्मही आहेत. डाळिंबाची ताजी साल वाटून पाण्यामध्ये मिसळून हे पाणी गाळून पिल्यास महिलांच्या गर्भधारण क्षमतेमध्ये वाढ होते.

डाळिंब सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हृदयासाठी हे खूप लाभदायक फळ असून दररोज एक ग्लास डाळिंबाचे ज्यूस पिल्यास तब्यत ठणठणीत राहू शकते. ५० ग्रॅम डाळिंबाच्या रसामध्ये १ ग्रॅम विलायची पूड आणि अर्धा ग्रॅम सुंठ पूड टाकून पिल्यास पुरुषांना लघवीतून वीर्य जाण्याच्या समस्येतून आराम मिळेल. तसेच पोटदुखी व जुलाब होत असल्यास डाळिंबाचे दाणे आणि पानं एकत्र वाटून घ्यावीत. अद्रकाच्या रसामध्ये हे मिश्रण टाकून सेवन केल्यास पोटदूखी, जुलाब बंद होतात.

डाळिंबाच्या झाडाची १०० ग्रॅम हिरवी पाने अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. एक चतुर्थांश पाणी शिल्लक राहिल्यानंतर त्यामध्ये ७५ ग्रॅम तूप आणि ७५ ग्रॅम साखर मिसळावी. सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण सेवन केल्यास चक्कर येणे बंद होते. तसेच डाळिंबाच्या झाडाची १० ग्रॅम हिरवी पाने अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. या पाण्याने सकाळी १० ते १२ गुळण्या केल्यास सतत येणारे तोंड येणार नाही.


‘डाळिंबा’ची साल सुद्धा आहे गुणकारी, वाढते गर्भधारणा क्षमता