बातम्या
मलकापूर येथे पिकअपची धडक बसून हमाल मजूर जागीच ठार
By nisha patil - 3/14/2025 10:00:28 PM
Share This News:
मलकापूर येथे पिकअपची धडक बसून हमाल मजूर जागीच ठार
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे पिकअप गाडीच्या धडकेत शिंपे इथल्या ज्ञानदेव जगन्नाथ पाटील या ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आशीर्वाद प्लाझा, आबाश्री ऍग्रो समोर घडलीय. याप्रकरणी पिकअप चालक मारुती ज्ञानदेव पाटील यांच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झालाय त्याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल असल्याची माहिती आज शुक्रवार 14 मार्च दुपारी एक वाजता शाहूवाडी पोलिसांनी दिलीय.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की शिंपे इथले मारुती पाटील हे मलकापुरात हमालीचे काम करत होते. गुरुवारी सायंकाळी आबाश्री ऍग्रो येथे पीकअप चालक खताने भरलेली गाडी मागे घेत असताना मागे उभा असलेल्या हमाल ज्ञानदेव पाटील यांना जोराची धडक बसली. त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पूर्वीचे ते मृत झाल्याचे डॉक्टरांच्या कडून घोषित करण्यात आले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय घेरडे , उपनिरीक्षक अभिजीत पाटील यांच्या सह शाहूवाडी पोलीस यांनी तात्काळ भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सरुड इथला पीकअप चालक मारुती ज्ञानदेव पाटील यांच्या विरोधात शाहूवाडी पोलीसांत गुन्हा नोंद झालाय. प्रकरणाचा अधिक तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत
मलकापूर येथे पिकअपची धडक बसून हमाल मजूर जागीच ठार
|