बातम्या
प्रतिपंढरपूर कोल्हापूर - नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ लोकार्पण सोहळा
By nisha patil - 3/30/2025 11:58:56 PM
Share This News:
प्रतिपंढरपूर कोल्हापूर - नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ लोकार्पण सोहळा
कोल्हापूर, ३० मार्च: श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळातर्फे दरवर्षी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर (नंदवाळ, ता. करवीर) पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. ही वारी कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासाठी महत्त्वपूर्ण असून, हजारो वारकरी व लाखो भाविक या वारीत सहभागी होतात.
भाविकांची दीर्घकाळची इच्छा पूर्ण करत, श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या चांदीच्या रथाचे लोकार्पण सोमवार, ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे. ७० किलो चांदीचा हा भव्य रथ कै. सौ. मालन विनायकराव क्षीरसागर व कै. श्री. विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास अनेक मान्यवर संत, आध्यात्मिक गुरु व वारकरी संप्रदायाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत:
प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी
ह.भ.प. श्री. चैत्यन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज
प.पू. श्री. आनंदनाथ महाराज सांगवडेकर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती, पंढरपूरचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज
ह.भ.प. श्री. गुरु अनिकेत महाराज मोरे (जगद्गुरु तुकोबारायांचे १२ वे वंशज)
प.पू. परमात्मराज महाराज हृदायेन
ह.भ.प. श्री. बाळासाहेब महाराज चोपदार
प.पू. रत्नाकर शिंदे काकाश्री
प.पू. श्री. गुरु चैतन्यजी महाराज
या भव्य सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायातील भाविक, कोल्हापूर जिल्ह्यातील भक्तगण आणि आध्यात्मिक गुरू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
प्रतिपंढरपूर कोल्हापूर - नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ लोकार्पण सोहळा
|