बातम्या

इचलकरंजीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात!

Preparations for the Ichalkaranjit state


By nisha patil - 3/20/2025 7:51:24 PM
Share This News:



इचलकरंजीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात!

आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मैदानाची पाहणी केली

महाराष्ट्र शासनाच्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल मैदानाला भेट दिली.

यावेळी मैदानाची गुणवत्ता, खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा, प्रेक्षकांसाठी व्यवस्था आणि सुरक्षेचे निकष तपासण्यात आले. विविध क्रीडा संस्थांचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन आणि क्रीडा संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांवर भर देण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून इचलकरंजीचा क्रीडा क्षेत्रातील मान वाढेल आणि युवा खेळाडूंना उत्तम संधी मिळेल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.


इचलकरंजीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात!
Total Views: 26