बातम्या
मुरगूड-गारगोटीत खाजगी बस चालकांची बैठक...
By nisha patil - 3/15/2025 3:15:03 PM
Share This News:
मुरगूड-गारगोटीत खाजगी बस चालकांची बैठक...
समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन
खाजगी बस चालकांच्या विविध अडचणी व समस्यांसंदर्भात आज मुरगूड आणि गारगोटी येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत चालकांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी, प्रशासनाकडून होणारा त्रास, तसेच वाहतुकीशी संबंधित विविध प्रश्न मांडले.
या चर्चेदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू दादा जाधव आणि राधानगरी तालुकाध्यक्ष राहुल दादा कुंभार यांनी चालकांचे प्रश्न गांभीर्याने ऐकले व लवकरच कोल्हापूर येथे मोठी बैठक घेऊन या समस्यांचे त्वरित समाधान करण्याचे आश्वासन दिले.
चालकांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या हक्कांसाठी मनसे ठामपणे उभी राहील, असेही यावेळी सांगण्यात आले. आगामी कोल्हापूर बैठकीत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावले जातील, अशी अपेक्षा आहे.
मुरगूड-गारगोटीत खाजगी बस चालकांची बैठक...
|