बातम्या
उद्योग भवन प्रशासनाच्या आवारात ठिय्या आंदोलन..
By nisha patil - 3/15/2025 8:37:51 PM
Share This News:
उद्योग भवन प्रशासनाच्या आवारात ठिय्या आंदोलन..
म.न.से. स्टाईलने प्रश्नांना निरुत्तर, कारवाई थांबली
आज शनिवार, 15 मार्च रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने कोल्हापूर येथील उद्योग भवनात जाहीर केलेल्या नियमानुसार, गोकुळ शिरगाव येथील “महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रणित भाजी मार्केट”वर पूर्वतयारीत कारवाई संदर्भात उठाव दिसून आला. संबंधित कारवाईची अंमलबजावणी करणार्या अधिकारीगण, कनिष्ठ अभियंता नाईक साहेब यांच्या म.न.से. स्टाईलमध्ये कार्यालयात खाली मांडी घालून ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.
आमच्या विचारणा केल्यावर अधिकारी नाईक निरुत्तर राहिल्यामुळे नियोजित कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली.यावेळी राजू जाधव नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव भाजी विक्रेत्यांनी दाखवली तीव्र प्रतिक्रियाया ठिय्या आंदोलनाच्या वेळी अनेक प्रभावशाली नेते आणि स्थानिक भाजी विक्रेते उपस्थित होते. राजू जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, राहुल कुंभार, राजू लांबोरे, भिमराव खानविलकर, केदार आणि असंख्य गोकुळ शिरगावचे भाजी विक्रेते एकत्र येऊन या कारवाईवर तीव्र आक्रोशाची छाप उमटवू लागले.
या घटनाक्रमात म.न.से. स्टाईलने भविष्यात अशा प्रकारच्या कारवाईविरूद्ध प्रचंड आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला असून, प्रशासनाकडून पुढील कारवाईबाबत अधिक स्पष्टता आणि जबाबदारीची अपेक्षा ठेवली जात आहे.
उद्योग भवन प्रशासनाच्या आवारात ठिय्या आंदोलन..
|