बातम्या
शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By nisha patil - 4/3/2025 5:15:33 PM
Share This News:
शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
शिक्षकेतर कर्मचारी पदभरती करावी,आदी मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन
कोल्हापुरातील सरकारी - निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार ६ मार्चला धरणे, सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती द्यावी, माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना सुरू करावी. तत्काळ शिक्षकेतर कर्मचारी पदभरती करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी केले आहे.
शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
|