बातम्या
सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानाचा प्रश्न – आ. सतेज पाटील यांची लक्षवेधी सूचना
By nisha patil - 3/25/2025 2:46:44 PM
Share This News:
सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानाचा प्रश्न – आ. सतेज पाटील यांची लक्षवेधी सूचना
कोल्हापूर: राज्यातील १२,५००+ सार्वजनिक ग्रंथालयांना मिळणाऱ्या अनुदानात अनेक वर्षांपासून वाढ न झाल्याने त्यांचे भवितव्य संकटात आले आहे. याबाबत आ. सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली.
ग्रंथालयांना अत्यल्प वार्षिक अनुदान मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि फर्निचर यासाठी खर्च करणे कठीण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असताना सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, २०२४-२५ साठी २०९.९० कोटींची अनुदानवाढ करण्यात आली आहे. तसेच ९९३ अकार्यक्षम ग्रंथालयांची मान्यता रद्द करून, त्याऐवजी नवीन ९९३ पात्र ग्रंथालयांना मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानाचा प्रश्न – आ. सतेज पाटील यांची लक्षवेधी सूचना
|