बातम्या
लॉकडाऊनमध्ये काढलेल्या मोर्चाप्रकरणी राजू शेट्टी व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता
By nisha patil - 3/20/2025 7:46:29 PM
Share This News:
लॉकडाऊनमध्ये काढलेल्या मोर्चाप्रकरणी राजू शेट्टी व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता
जयसिंगपूर (प्रतिनिधी) – संपूर्ण कर्जमुक्तीसाठी 2021 साली लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रकरणी दाखल गुन्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील मुख्य न्याय दंडाधिकारी शैलेश बाफना यांनी हा निर्णय दिला.
2021 मध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांदरम्यान शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्च्याला परवानगी नाकारली होती. त्यावेळी स्वाभिमानी पदाधिकारी व पोलिसांमध्ये झटापट झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आजच्या सुनावणीत राजू शेट्टी, सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष अजित पोवार, प्रा. डॉ. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, शैलेश आडके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
याप्रकरणी ॲड. श्रेणीत पाटील, ॲड. ब्रिजेश शास्री, ॲड. सुवर्णभद्र पाटील, ॲड. ऋषिकेश शास्री, ॲड. टी. वाय. जाधव, ॲड. अमेय बकरे, ॲड. व्ही. व्ही. डोईजड, ॲड. अपूर्वा वैभव प्रज्ञासूर्य, ॲड. साक्षी जगताप यांनी विनामूल्य न्यायालयीन कामकाज पाहिले.
लॉकडाऊनमध्ये काढलेल्या मोर्चाप्रकरणी राजू शेट्टी व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता
|