बातम्या
पर्यावरणव मंत्रालय व वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्या महिलांसाठी पदभरती
By nisha patil - 2/4/2025 12:01:34 AM
Share This News:
पर्यावरणव मंत्रालय व वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्या महिलांसाठी पदभरती
कोल्हापूर, : माजी सैनिक तथा पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार व राज्य सरकार (वनविभाग) मधुन सेवानिवृत्त महिलांसाठी 136 Inf Bn (TA) Eco, Mahar, मध्ये GD, Clerks, Chef Community, Dresser, Mess Keeper, Steward आणि Blacksmith पदांसाठी (55 Vacancies) दिनांक 21 ते 23 एप्रिल 2025 या कालावधीत एस. आर. पी. एफ. ग्राऊंड, धुळे, जिल्हा धुळे येथे भरती होणार आहे. जिल्ह्यातील योग्य उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रांसह दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5.30 वाजता एस. आर. पी. एफ. ग्राऊंड, धुळे, जिल्हा धुळे (महाराष्ट्र) येथे आपल्या शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणी करिता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी केले आहे.
पर्यावरणव मंत्रालय व वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्या महिलांसाठी पदभरती
|