बातम्या

केस काळे करण्यासाठी उपाय

Remedies for black hair


By nisha patil - 11/4/2024 9:06:56 AM
Share This News:



 अकाली केस पिकणे ही समस्या सध्या सर्वच वयोगटात दिसून येते. या समस्येवर बहुतांश लोक बाजारात मिळणारी विविध प्रकारची महागडी प्रॉडक्ट वापरून उपचार करताना दिसतात. परंतु त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. मात्र, या समस्येवर काही घरगुती उपाय केल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात. 

हे उपाय करा
1. गावठी तुपाचा वापर केल्याने केस काळे होऊ शकतात. केसांना गावठी तूप लावून मसाज केल्याने काही दिवसातच फरक दिसू लागेल. आठवड्यातून दोनदा केसांना गावठी तूपाने मसाज करा. निरोगी केसांसाठी गावठी तूप खूप फायदेशीर आहे.


2. केस काळे करण्यासाठी गाजर देखील खूप उपयुक्त आहे. गाजराचा रस दररोज 250 ग्रॅम बनवा आणि त्याचे सेवन करा. हे केल्याने तुमचे पांढरे केस काळे होतील.

3. काळ्या तिळाचे सेवन केल्याने पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा एक चमचा काळे तीळ खाल्ल्याने लाभ होऊ शकतो.

4. कोरफड चेहरा आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी सुद्धा कोरफड जेल खूप प्रभावी आहे.
कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांवर लावा.


केस काळे करण्यासाठी उपाय