बातम्या
औरंगजेबाची कबर हटवा : विहिंप
By nisha patil - 3/17/2025 4:48:37 PM
Share This News:
औरंगजेबाची कबर हटवा : विहिंप
सरकारने कबर हटवावी अन्यथा कारसेवेचा इशारा – विहिंप
छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचे तातडीने निष्कासन करावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदू धर्मवीरांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचे अस्तित्व स्वतंत्र भारतात असू नये, असे मत निवेदनात मांडण्यात आले आहे. सरकारने त्वरीत निर्णय न घेतल्यास हिंदू समाज स्वयंप्रेरणेने कार सेवा करून ती हटवेल, असा इशाराही विहिंपने दिला आहे.
औरंगजेबाची कबर हटवा : विहिंप
|