बातम्या
मिड स्वीडन युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींची डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठास भेट
By nisha patil - 3/20/2025 7:49:22 PM
Share This News:
मिड स्वीडन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांची डी. वाय. पाटील विद्यापीठास भेट
कोल्हापूर – मिड स्वीडन युनिव्हर्सिटी मधील संशोधक डॉ. मॅग्नस हुम्मेलगार्ड आणि डॉ. मनीषा फडतरे यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतरशाखीय संशोधन केंद्रास (CIR) भेट देऊन त्याच्या कार्याचे कौतुक केले.
संशोधन सहकार्य वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदानास चालना देणे यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. प्रगत प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि पेटंट्सच्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीमुळे दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य अधिक बळकट होणार आहे.
मिड स्वीडन युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींची डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठास भेट
|