बातम्या
भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक संपन्न
By nisha patil - 3/4/2025 5:18:14 PM
Share This News:
भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर – भाजपा संघटन पर्व 2025 अंतर्गत चौथा टप्पा सुरू झाला असून, लवकरच मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सभासद नोंदणी, बूथ समिती व बूथ अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले.
कोल्हापूर पश्चिम, कोल्हापूर पूर्व व महानगर जिल्ह्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रदेश सचिव महेश जाधव आदी उपस्थित होते.
संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी भाजपने नव्या पद्धतीने 100 बूथला एक मंडल अशी रचना सुरू केली असून, त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. पक्षाच्या धोरणांना गती मिळावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय राहावे, असे हाळवणकर यांनी सांगितले.
बैठकीत महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यांचा आढावा घेतला. या वेळी भाजपा प्रदेश कोल्हापूर महानगर प्रवासी नेते भरत पाटील, राहुल चिकोडे, शिवाजी बुवा, डॉ. राजवर्धन, गायत्री राऊत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक संपन्न
|