बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयात महानेट अंतर्गत आढावा बैठक....
By nisha patil - 1/25/2025 1:31:35 PM
Share This News:
महानेट अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी ना. प्रकाश आबिटकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत महानेट अंतर्गत सुरू असलेल्या कामांची तपासणी करून त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांमध्ये किती रस्ते पुर्ववत केले. .
तसेच संबंधित यंत्रणेची मंजुरी घेतली का याची चौकशी करण्याच्या सूचना आबिटकरांनी दिल्या. केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात महानेट प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यात काम सुरू करण्यापूर्वी त्या त्या यंत्रणेकडून मंजुरी घ्या. शासनाच्या नियमावलीनुसार महानेटकडून कार्यवाही व्हावी ही अपेक्षा आहे. सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा मिळावी हा सर्वांचाच उद्देश आहे. परंतु हे काम करीत असताना चांगले रस्ते, चांगल्या सोयी सुविधांची पुन्हा तोडफोड करू नये, नियमावली पाहून महा नेटने काम करावे असे आबिटकरांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महानेट अंतर्गत आढावा बैठक....
|