बातम्या

कारागृह खरेदीत ५०० कोटींचा घोटाळा? चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Rs 500 crore scam in prison purchase


By nisha patil - 8/3/2025 5:08:25 PM
Share This News:



कारागृह खरेदीत ५०० कोटींचा घोटाळा? चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जयसिंगपूर : राज्यातील कारागृह विभागात २०२३ ते २०२५ दरम्यान रेशन, कॅन्टीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या कार्यकाळातील खरेदी नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, राजू शेट्टी यांनी त्याचा खोटेपणा उघड करत पुराव्यानिशी माहिती दिली.

🔹 संशयास्पद खरेदी:

  • ३० KVA जनरेटर – बाजारभाव ५.४० लाख, खरेदी किंमत ९.९० लाख
  • HP लेसर प्रिंटर – बाजारभाव ३०,०००, खरेदी किंमत ४९,२२०

📌 राजू शेट्टी यांचा आरोप:

  • खरेदीत ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रीय निविदांची मागणी करण्यात आली.
  • वस्तूंचे बाजारभाव आणि खरेदीदरात मोठी तफावत.
  • दोन्ही अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, सत्य पुराव्यांसह समोर आणणार.

राजू शेट्टी यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि गृह सचिवांची भेट घेऊन अधिकृत चौकशीची मागणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


कारागृह खरेदीत ५०० कोटींचा घोटाळा? चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Total Views: 45