बातम्या
चंदनाने दूर होईल टॅनिंग, असा बनवा फेस पॅक
By nisha patil - 7/8/2024 8:59:59 AM
Share This News:
चंदनाची पेस्ट त्वचेला थंडावा प्रदान करते. त्वचेला मॉइस्चराइज करण्यासाठी चंदन फायदेशीर असते. चंदनाची पेस्ट टॅनिंग दूर करते. उन्हाळा आला की त्वचेवर विशेष लक्ष द्यावे लगते. सूर्याचे प्रखर किरणे त्वचेवर परिणाम करतात. ज्यामुळे त्वचा खराब होते. ज्यांची त्वचा लवकर टॅनिंग होते, त्यांनी त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. या समस्येपासून आराम मिळण्यासाठी चंदनाचा लेप हा एक नैसर्गिक उपाय आहे.
चंदनाचा लेप एक नैसर्गिक उपाय असून हजारो वर्षापासून त्वचेसाठी उपयोग केला जात आहे. चंदनाचा लेप लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. व उष्णतेपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊ या चंदन फेस पॅक कसा वापरावा. चंदनाचा एक तुकडा बारीक करून घ्यावा. आता यात दूध किंवा दही मिक्स करा. एक मऊ पेस्ट बनेल. आता या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. त्या नंतर 15 ते 20 मिनिटांनी धुवून टाकावे व चेहऱ्याला टॉवेलने पुसून घ्यावे. नंतर मिठाच्या पाण्याने परत धुवावे. तुम्ही बाजारात मिळणाऱ्या चंदन पॉवडरचा देखील उपयोग करू शकतात.
चंदनाचे फायदे
1. चंदन त्वचेला थंडावा प्रदान करते. तसेच उष्णतेपासून आराम मिळतो
2. चंदनाचा लेप त्वचेला मॉइस्चराइज करतो आणि त्वचेला मौ , सुंदर ,चमकदार बनवतो .
3. चंदनात अँटी-इंफ्लेमेट्री गुण असतात जे त्वचेचे सूजने कमी करून आरोग्यदायी ठेवतो.
4. चंदनाचा लेप त्वचेला सूर्याच्या किरणांच्या प्रभावपासून वाचवतो व टॅनिंग कमी करतो.
चंदनाने दूर होईल टॅनिंग, असा बनवा फेस पॅक
|