विशेष बातम्या

साने गुरुजी बालक मंदिरच्या अभिनव उपक्रमाने चिमुकल्यांचे भावविश्व उलगडले...

Sane Guruji Balak Mandir


By nisha patil - 4/4/2025 11:02:05 PM
Share This News:



साने गुरुजी बालक मंदिरच्या अभिनव उपक्रमाने चिमुकल्यांचे भावविश्व उलगडले...
   

चिमुकल्यांचा कळस साने गुरुजी बालक मंदिरात!

स्वावलंबनाचा धडा – लहान हातांनी मोठी कामे!

पापड लाटणे, गाजर खिसणे, दह्याचे ताक करणे, ताकाचे लोणी करणे, शेंगदाण्याचा कुट करणे, कोशिंबीर करणे,दारात छानशी रांगोळी काढणे ही आता मोठ्यांची कामे उरली नाहीत. आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील साने गुरुजी बालक मंदिर येथील चिमुकल्या सवंगडयांनी अगदी तल्लीन होवून हम किसीसे कम नही । हे सप्रमाण सिद्ध केले .

यासाठी निमित्त होतं प्रात्यक्षिक दिनाचं . साने गुरुजी बालक मंदिर मधील चिमुकल्यांनी घरामध्ये आपल्या आईच्या कामाचे निरिक्षण करून त्याचा हट्टाने सराव करून प्रत्यक्ष उपक्रमात चांगलीच नैपुण्यता मिळवली . चिमुकल्यांच्या विश्वात काही कलाकुसरही अनुभवण्यास मिळाली . मुख्याध्यापिका सारीका ढेरे आणि उपशिक्षिका संगीता माने यांनी आपले अनुभव कथन केले . कार्यमग्न मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून रम्य ते बालपण याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले . आपल्या मुलांचे भावविश्व अनुभवण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती .

या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले . कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संकपाळ यांनी सानेगुरुजी बालकमंदिरच्या चिमुकल्यांचे कौतुक केले . प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांनी प्रोत्साहन दिले . सदर बाजार परिसरातील पालकांनी बालकमंदिरच्या उपक्रमाची माहिती घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले


साने गुरुजी बालक मंदिरच्या अभिनव उपक्रमाने चिमुकल्यांचे भावविश्व उलगडले...
Total Views: 16