बातम्या
दिशा सालियन प्रकरणात संजय निरुपम यांचा गंभीर आरोप – आदित्य ठाकरे मुख्य आरोपी?
By nisha patil - 3/27/2025 4:35:32 PM
Share This News:
दिशा सालियन प्रकरणात संजय निरुपम यांचा गंभीर आरोप – आदित्य ठाकरे मुख्य आरोपी?
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दिशा सालियन प्रकरणात मोठा गौप्यस्फोट करत आदित्य ठाकरे यांना मुख्य आरोपी म्हणून जबाबदार धरले आहे. त्यांनी दावा केला आहे की, दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पंचोली यांची नावे आहेत.
निरुपम यांनी सांगितले की, दिशा सालियनच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तिचा मृतदेह कपड्यांशिवाय आढळल्यामुळे बलात्काराच्या आरोपांमध्ये तथ्य असू शकते. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर आदित्य ठाकरे यांनीही न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे.
दिशा सालियन प्रकरणात संजय निरुपम यांचा गंभीर आरोप – आदित्य ठाकरे मुख्य आरोपी?
|