बातम्या

 शिक्षण क्षेत्रातील अथक प्रवास आणि समाजसेवेतले योगदान - सविता दरवान 

Savita Darwan


By nisha patil - 12/3/2025 6:26:34 PM
Share This News:



 शिक्षण क्षेत्रातील अथक प्रवास आणि समाजसेवेतले योगदान - सविता दरवान 

सविता दरवान या शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी 14 वर्षांनंतर शिक्षण पूर्ण करून अंगणवाडी कोर्स केला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर महिलांसाठी पाच-सहा वर्षे ऑडिटच्या कामांमध्ये मोठे योगदान दिले.

सविता दरवाण यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीतून केली आणि हळूहळू शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्या बालवाडीपासून अध्यापनाचे कार्य करत करत प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली. आपल्या ज्ञानाच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी प्राथमिक शाळेत उत्तम अध्यापन केले.
 

आज त्या हायस्कूलमध्ये अध्यापन करत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून घडवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे.
 

गेल्या 15 वर्षांपासून गोखले कॉलेज मुक्त विद्यापीठात व्याख्याता (Lecturer) म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सखोल ज्ञानाच्या आधारे त्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत आहेत. त्यांच्या व्याख्यानशैलीमुळे विद्यार्थी प्रेरित होऊन शिक्षणाकडे वळतात.


सविता दरवान – शिक्षण क्षेत्रातील अथक प्रवास आणि समाजसेवेतले योगदान
Total Views: 20