बातम्या

सायाटिका आणि योगासने

Sciatica and yoga


By nisha patil - 6/8/2024 7:30:52 AM
Share This News:



सायाटिका ) हा शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू आहे. हा मज्जातंतू कमरेपाशी सुरू होऊन पाया पर्यंत जातो. सायाटिका पेन म्हणजे सायाटिक मज्जातंतूच्या मार्गावर पसरणारी वेदना. सायाटिकाची तीव्र कळ कंबरेच्या खालच्या भागात सुरू होऊन पार्श्‍वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यांत पसरते. त्यामुळे साहजिकच पाय खूप दुखतात.

सायटीकाचा त्रास म्हणजे पायाच्या नसांमध्ये तीव्र आणि असह्य वेदनांमुळे होणारा त्रास असतो. सायटीकाच्या वेदनांमुळे पेशंट नीट चालूही शकत नाही, कधी कधी तर एकाच स्थितीत उभाही राहू शकत नाही. यावेदना होण्या सोबतच अगदी दररोजची कामे करणे अवघड होऊन जाते. शरीरातील सायटीकाच्या नसा कंबरेच्या खालच्या भागातून सुरु होतात आणि पुढे हीप्स, मांड्या तसेच पायाच्या तळव्या पर्यंत जातात. सायटीका होण्याच्या मुख्य कारणांमध्ये पायांवर दाब पडणे, पायांची आग होणे आणि सायकेटीव्ह नर्व्ह्स म्हणजेच पायाच्या खालच्या भागात झालेली दुखापत या कारणांचा समावेश आहे. याशिवाय मसल्सला झालेली दुखापत, मसल्स टाईट होणे किंवा पायांचा जास्त वापर होणे अशा कारणांचा सायटीकाचा त्रास होण्याच्या कारणांमध्ये समावेश होतो. काही योगासनांच्या नियमित अभ्यासामुळे सायटीकाच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. याशिवाय ही आसने आपल्याला सायटीकाच्या लक्षणा पासून सुटका होण्यासाठी मदत करतील. सायटीकाचे दुखणे काय आहे? कशामुळे तो होतो? तसेच सायटीकाच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी करावयाची योगासने आणि घ्यावयाची काळजी या विषयी माहिती घेऊया. या उपाया पासून सहजपणे सायटीकाच्या दुखण्यापासून आराम मिळवू शकतो.

योग आणि सायटीकाचे दुखणे
भुजंगासन आणि शलभासन सारखी आसने सायटीकाच्या लक्षणांना बरे करण्या मध्ये मदत करू शकतात. योगासना मध्ये पुढील गोष्टी कमी करण्याची क्षमता आहे. 
 गंभीर स्वरूपाचे लोअर बॅक पेन
कामकाज करताना त्रास होत असताना
 पेन कीलर वापर
जर तुम्ही योग शिक्षकाच्या देखरेखी खाली योग्य पद्धतीने केलीत तर त्याचे फायदे शरीराला मिळू शकतात. सायटीकाच्या दुखण्या पासून आराम मिळण्यासाठी करावयाच्या १० योगासना विषयी माहिती जाणून घेऊया.

१) बालासन
या आसनामुळे आराम मिळायला आणि आरोग्यपूर्ण रहायला मदत मिळते. हे पाठीच्या कण्याला स्ट्रेच करायला मदत करते. हे आपल्या हिप्स मध्ये लवचिकता वाढवते; तसेच हिप्स, मांड्या आणि कमरेच्या खालच्या भाग आखडला असेल तर यापासून आराम मिळायला मदत करते. जर दुखणे जास्त असेल आणि सहजपणे आसन करू शकत नसाल, तर मांडीखाली, छातीखाली किंवा डोक्याखाली तक्क्या किंवा उशी ठेऊनही ही आसने करू शकता. 

 

२) अधोमुख श्वानासन
पुढच्या बाजूला वाकून केले जाणारे हे आसन शरीर एका स्थितीत अलाईन करायला मदत करते. या आसनामुळे वेदना आणि मसल्स मोकळे व्हायला मदत होते. हे आसन केल्यामुळे शरीरातील ऊर्जेचा संचार वाढते आणि योग्य संतुलन राखायला मदत होते. 
३) अर्ध चंद्रासन
हे आसन शरीराला शक्ती देते, तसेच स्थिरता आणि बॅलन्स राखायला मदत करते. हे आसन शरीराची लवचिकता वाढवते, ताण कमी करून पाठीच्या कण्या सोबतच ग्लूट्स आणि मांड्या चांगल्या पद्धतीने स्ट्रेच करते. जर हे आसन पहिल्यांदा करत असाल तर सपोर्टसाठी भिंतीला टेकून मदत घेऊ शकता. याशिवाय आपण आपले हात खाली ब्लॉक करू शकता. 
४) भुजंगासन
शरीराला आराम देणारे हे आसन पाठीचा कणा मजबूत करण्या सोबतच मणक्याला चांगला ताण देणारे आहे. शरीरातील लवचिकता आणि रक्ताभिसरण वाढवण्यास ते खूप मदत करते.
५) शलभासन
हे आसन पाठीचा कणा, ग्लुट्स आणि मांड्या मजबूत करण्यास मदत करते. तसेच कोर आणि खालच्या पाठीला स्थिर करते. हे आपल्या नितंबा मध्ये रक्ताभिसरण आणि लवचिकता वाढविण्यात मदत करते. 
६) पवनमुक्तासन
पाठीच्या खालच्या भागात, हिप्स ग्लुट्स मधील स्नायूंचा घट्टपणा दूर करण्यासाठी हे उत्तम आसन आहे. हे आसन सोपे करण्यासाठी, एका वेळी एकाच पायाने करू शकता. 
७) राजकपोतासन
याच्या सरावाने कंबरेला पाठीच्या खालच्या भागाला आधार देण्यास मदत होते आणि हिप्सवर कमी दबाव पडतो. हे केल्याने, ग्लूट्स आणि हिप्स तसेच पायरीफॉर्मिस स्नायूंना चांगले स्ट्रेचिंग मिळते. 
८) सेतु बंध सर्वांगासन
याच्या सरावाने पाठीचा कणा ताणला जातो आणि शरीरात होणार्‍या वेदना, तणाव कमी होतो. त्याचा हळू हळू परिणाम शरीरात रक्त परिसंचरण वाढवण्यास मदत करतो. याशिवाय ते पाय, ग्लूट्स आणि कोर मजबूत करण्यास मदत करते. 
९) अर्ध मत्स्येंद्रासन
शरीर वाकवून केलेले हे आसन मणक्याला ताणते आणि उघडते. यामुळे वेदना आणि तणावातून आराम मिळतो. याशिवाय शरीर वळवताना पाठीच्या खालच्या भागात यामुळे दिलासा जाणवू शकतो. 
१०) विपरीत करणी
या आसनाच्या नियमित सरावाने शरीराला परत ऊर्जा प्राप्त होते. हे शरीराला आराम करायला, रिलॅक्स करायला आणि रिकव्हर करण्यास मदत करते. जर या आसनाचा सराव करण्यात अडचण येत असेल तर हिप्सच्या खाली उशी ठेवू शकता. 

सायटीकाचा त्रास होत असल्यास ही योगासने करु नका
सायटीकाचा त्रास होत असेल तर कोणती आसने करु नयेत? कारण काही आसने केल्यामुळे दुखणे वाढू शकते. अशा मध्ये शरीराची क्षमता समजून घेऊन योगासने केली पाहीजे. जर कोणतेही आसन करताना थोडासाही त्रास झाला तर लगेचच ते योगासन करण्याचे थांबवावे. ज्या आसनामध्ये आपल्याला पुढे वाकून किंवा ताठ उभे राहून करावे लागणार असेल आणि त्यामुळे वेदना होत असतील अशी आसने विशेषत: सायटीकाचा त्रास होत असल्यास करु नयेत. केवळ अधोमुख श्वानासन याला अपवाद आहे. हे आसन केले तरी चालू शकते. जर तुम्ही अशी आसने करत असाल जी केल्यामुळे पेल्व्हिस आणि लोअर बॅक मध्ये लगेचच वेदना सुरु होत असतील तर करु नये. सायटीकाच्या वेदना शक्यतो एकाच पायात होतात. अनेकदा या वेदना अतिशय असह्य असतात. म्हणूनच जर एखादे आसन एका पायाने करताना त्रास होत असेल तर दुसर्‍या पायाने करावे. कोणतेही आसन करताना गुडघे मुडपून करू शकता. जर असे असे करताना काही त्रास होत असेल तर गुडघ्याच्या खाली तक्क्या घेऊन करू शकता. शक्य असेल तर योग वर्गात जाणे सुरू करू शकता किंवा महिन्यातून एकदा योग शिक्षकाची मदत घेऊ शकता. याशिवाय सायटीकासाठी योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जर २ महिन्या पेक्षा जास्त काळ सायटीकाचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्या शिवाय योगाभ्यास सुरू करू नये.


सायाटिका आणि योगासने