बातम्या

मुंबई आझाद मैदानात पँथर आर्मीचे बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस

Second day of Panther Army


By nisha patil - 4/3/2025 5:13:36 PM
Share This News:



मुंबई आझाद मैदानात पँथर आर्मीचे बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस

मुंबई – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात आणि अन्य मागण्यांसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले, राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्रसिंग वालिया, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश जामसंडेकर, राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे आणि इतर मान्यवर करत आहेत.

मुख्य मागण्या:

  1. योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट (बागायतसाठी ८ लाख व जिरायतीसाठी ५ लाख) रद्द करावी व बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात.
  2. दारिद्र्य रेषेची अट रद्द करावी व राज्य शासनाने लँड बँक तयार करून पात्र भूमीहीनांना जमीन द्यावी.
  3. एक ते पाच गुंठे जमिनी असलेल्या अल्पभूधारकांना भूमिहीन घोषित करून योजनेचा लाभ द्यावा.
  4. २५ वर्षांपूर्वी आई-वडील किंवा पती-पत्नीच्या नावे शेतजमीन नसल्याच्या दाखल्याची अट रद्द करावी.
  5. सन २०१८ पूर्वी लाभ घेतलेल्या शेतमजुरांच्या जमिनीवरील कर्ज माफ करावे.
  6. रमाई आवास योजनेअंतर्गत सर्व बौद्ध बेघरांना सरसकट १० लाखांचे घरकुल अनुदान मिळाले पाहिजे.
  7. अनुसूचित जाती व बौद्ध समाजासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेट मंजूर करावे आणि निधी इतरत्र वळवू नये.
  8. माणगाव राष्ट्रीय स्मारकासाठी मंजूर १६९ कोटी रुपये तत्काळ वितरित करावेत.
  9. मागासवर्गीयांसाठी व्याज अनुदान योजना सुरू करून १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे.

आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

या आंदोलनाला आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत दादासाहेब यादव, प्रा. अरुण मेढे, राजेश घोलप, हरीश चव्हाण, अनिल घोडके, पोर्णिमा बनसोडे आणि अन्य कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू असून, मागण्यांबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.


मुंबई आझाद मैदानात पँथर आर्मीचे बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस
Total Views: 20