बातम्या
हुपरी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन..
By nisha patil - 3/21/2025 11:10:39 PM
Share This News:
हुपरी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन..
स्वसंरक्षण शिकण्याची काळाची गरज – प्राचार्य पाडळकर
हुपरी : रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आय आय बिलीव्ह स्पोर्ट्स फाउंडेशनच्या उमेश चौगुले आणि माजी विद्यार्थिनी प्रतीक्षा जाधव यांनी प्रशिक्षण दिले. स्वतःच्या सुरक्षेसाठी सहज उपलब्ध वस्तूंचा कसा उपयोग करावा, याचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले.
या शिबिरात रस्त्यावर, बस, रेल्वे, अनोळखी ठिकाणी संकट ओळखून त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. विजय पाडळकर यांनी विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण तंत्र आत्मसात करून आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. संध्या माने यांनी केले होते.
हुपरी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन..
|