बातम्या

60+ ज्येष्ठ नागरिक सहसा पुढील गोष्टींचा अनुभव घेतात:

Senior citizens 60 usually experience


By nisha patil - 6/8/2024 7:32:57 AM
Share This News:



चाला आरोग्यासाठी. 
~~~~~~~
       जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात ते पहाटे मिळणार नाहीत.
जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील...
~~~~~~~
    ...होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा/ साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.
~~~~~~~
सकाळी चालणे आवश्यक का आहे?
      जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटामिन डी भरपूर प्रमाणात मिळेल,
त्यामुळे शरिरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल.
दररोज सकाळी चालण्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.
अंधारात ऑक्सीजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात.
~~~~~~~
आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते, जर तुम्ही योग्य प्रमाणात कोवळे ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.
~~~~~~~
स्ट्रेस / तणाव मुक्ती साठी उपयोगी.
        मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे, किबहुना आवश्यकचं आहे , यामुळे सकाळचे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर डायबिटीक आहात तर त्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये जर फिरले तर डायबेटिस, ब्लडप्रेशर आणि हृदयरोग त्याचबरोबर मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.
~~~~~~~
सकाळीच का चालायचे?
      सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते, वातावरणात शांतता असते, स्फूर्ती प्रदान करणारे असते, त्याचबरोबर शरीरास व्यायाम होतो. ज्याचा फायदा तुमची ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो  यामुळे तुमची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि  प्रतिकारशक्तीही  वाढते, फक्त चालताना एकमेकांशी गप्पा मारू नयेत हे महत्त्वाचे.
~~~~~~~
चालण्याचे सर्वसाधारण फायदे.
१) त्वचा चमकदार होते, 
२) हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते, 
३) मधुमेह नियंत्रणात राहतो, 
४) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, 
५) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 
६) झोप चांगली लागते, 
७) प्रतिकारशक्ती वाढते, 
८) कोलेस्ट्रॉल कमी होते, 
९) कॅन्सर चे पेशंटना उपयोगी, 
१०) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 
११) प्रतिकारशक्ती वाढते, 
१२) हृदयाची कार्यक्षमता वाढते, 
१३) थकवा दूर होतो, 
१४) शरीरात स्फूर्ती येते, 
१५) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत, 
१६) चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.
१७) सर्व प्रकारच्या

 आजारांपा

पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क! 

अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते.  वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 

 हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. 
चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 

वेगाने चालण्याचे फायदे -

1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 
2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
5) रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
8)  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
10)  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
11) चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
13)  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
14)  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
16)  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
17)  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
18)  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
22)  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
23)  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
24)  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
25)  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
27)  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
28)  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
29)  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 
30) नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.


60+ ज्येष्ठ नागरिक सहसा पुढील गोष्टींचा अनुभव घेतात: