बातम्या

शाहूवाडीचा सुपुत्र शहीद! गावभर शोककळा..

Shahuwadis son martyred


By nisha patil - 3/15/2025 3:01:29 PM
Share This News:



शाहूवाडीचा सुपुत्र शहीद! गावभर शोककळा..

देशसेवेत कर्तव्य बजावताना शाहूवाडीच्या वीर जवानाला वीरमरण!

मणिपूरमध्ये डोंगर दरड कोसळून जवान सुनील गुजर यांचे दुर्दैवी निधन

मणिपूर - अरुणाचल प्रदेश सीमेवर रस्ता दुरुस्तीचे काम करत असताना डोजर दरीत कोसळल्याने शाहूवाडी तालुक्यातील शीत्तूर तर्फे मलकापूर येथील जवान सुनील विठ्ठल गुजर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सुनील गुजर यांनी २०१९ साली भारतीय सैन्यात प्रवेश घेतला. पुण्यात आर्मी इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मणिपूर येथे सेवा बजावत होते. १३ मार्च रोजी भूस्खलनानंतर रस्ता दुरुस्त करताना ते डोजर ऑपरेट करत होते. अचानक संतुलन बिघडल्याने डोजर खोल दरीत कोसळला आणि ते शहीद झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गावात शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू आहे. गावाने आपल्या वीर सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे.


शाहूवाडीचा सुपुत्र शहीद! गावभर शोककळा..
Total Views: 33