बातम्या
पानिपत (बसताडा) येथे 'शौर्य दिन' मोठ्या उत्साहाने साजरा
By nisha patil - 1/16/2025 3:33:52 PM
Share This News:
पानिपत (बसताडा) येथे 'शौर्य दिन' मोठ्या उत्साहाने साजरा
14 जानेवारी रोजी पानिपत (बसताडा), हरियाणा येथे देशभरातील अनेक मराठी शिवप्रेमी 'शौर्य दिन' साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी, राष्ट्रपती सन्मानित डॉ. अल्पना चौगुले यांच्या 'शिवराज्याभिषेक सोहळा' पेंटिंगने अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मराठा जागृती मंचाचे वीरेंद्रजी वर्मा, डॉ. वसंतराव मोरे, कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सोपान चौगुले यांनी 'शिवराज्याभिषेक' चित्रातील संदेश, शिवाजी महाराजांचे जनतेवरील प्रेम आणि इतिहासातील महत्त्व सांगितले. प्रा. श्री किरण पाटील यांनी महाराजांचा पोवाडा सादर करून वातावरणात जोश आणला.
डॉ. वसंतराव मोरे यांनी पानिपत लढाईतील मराठ्यांच्या शौर्याची आठवण ठेवली आणि त्यांचे संशोधन सादर करत रोड मराठा यांची ओळख पटवली. त्यांचा सत्कार करत एक लाख रोख रक्कम आणि शिवराज्याभिषेक पेंटिंग प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात श्री मिलिंद पाटील, डॉ. वसंतराव मोरे आणि वीरेंद्र वर्मा यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
पानिपत (बसताडा) येथे 'शौर्य दिन' मोठ्या उत्साहाने साजरा
|