आरोग्य

शेंडापार्क कुष्ठधाम जळीत प्रकरण:..

Shenda Park Leprosy Hospital Burning Case


By nisha patil - 3/27/2025 4:39:06 PM
Share This News:



शेंडापार्क कुष्ठधाम जळीत प्रकरण:..

ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त, प्रशासन झोपेत?

 युथ डेव्हलपमेंट फौंडेशनचा प्रशासनाला इशारा

शेंडापार्क कुष्ठधाम येथे वास्तू जळून खाक झाली असून, गांजा ओढणाऱ्या टोळक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक ठिकाणी गुन्हेगारी वाढल्याचा आरोप होत आहे.शाहू महाराजांच्या काळातील या ऐतिहासिक वास्तूला आग लागून मोठे नुकसान झाले, पण अजूनही पोलिसांचा पंचनामा झालेला नाही. जिल्हा परिषदेनेही अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद केलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.या दुर्घटनेनंतर युथ डेव्हलपमेंट फौंडेशनने जनजागृती अभियान राबवून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष राहुल चौधरी, सचिन जाधव, चंद्रकांत कांडेकरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.


शेंडापार्क कुष्ठधाम जळीत प्रकरण:..
Total Views: 18