बातम्या
निष्ठेची गुढी उभारून शिवसैनिकांनी गुढीपाडवा साजरा केला!
By nisha patil - 3/30/2025 11:59:35 PM
Share This News:
निष्ठेची गुढी उभारून शिवसैनिकांनी गुढीपाडवा साजरा केला!
कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्तीस्थळी अभिवादन करून आणि निष्ठेची गुढी उभारून कट्टर शिवसैनिक ग्रुप व शिव आरोग्य सेनेच्या वतीने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
या वेळी कोल्हापूर महानगरपालिका सहाय्यक आयुक्त श्री. कृष्णात पाटील यांचा आरोग्य विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात विकी मोहिते, गोविंद वाघमारे, शिवाजी माने, अमित पै, जयदीप निगवेकर, प्रशांत पाटील, शौनक भिडे, मंदार वाघवेकर, विनय क्षीरसागर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निष्ठेची गुढी उभारून शिवसैनिकांनी गुढीपाडवा साजरा केला!
|