बातम्या
साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकऱ्यांचे लक्षणीय उपोषण आंदोलन
By nisha patil - 3/22/2025 1:10:24 PM
Share This News:
साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकऱ्यांचे लक्षणीय उपोषण आंदोलन
प्रयोगशील शेतकरी आणि कार्यकर्ते साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लक्षणीय उपोषण आंदोलन करण्यात आले. विशेषतः महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देत आपली एकजूट व्यक्त केली.
हे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, साबळेवाडी शाखा उपाध्यक्ष संभाजी साबळे, तसेच अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साबळेवाडी, येवलुज, वाकरे, कुडिञे आणि खुपिरे या गावांतील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावत पाठिंबा दर्शवला.
साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकऱ्यांचे लक्षणीय उपोषण आंदोलन
|